अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- सिगारेट विक्री फेरीवाल्याची दुचाकी अडवून त्यास 1 लाख 5 हजारांस लुटल्याची घटना श्रीरामपूर- पुणतांबा रस्त्यावर खैरीनिमगाव शिवारात घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, मगर हे सिगारेट विक्री करून पुणतांब्याहून श्रीरामपूरकडे येत असताना त्यांची हिरो होंडा दुचाकी नं. 2784 ही गाडी चार अज्ञात चोरट्यांनी अडवून गाडीवरील मनोज लक्ष्मण मगर यास चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली .
त्यानंतर त्यांना धमकावत त्याच्याकडील रोख रक्कम 50 हजार रुपये व 50000 रुपये किमतीचे सिगारेट, मोबाईल असा एकूण 1 लाख 5796 रुपयांचा ऐवज रस्तालुटीत चोरून नेला आहे.
रस्तालूट प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये मगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतल्याचे समजते. दरम्यान पीडित मगर हे श्रीरामपूर येथील आयटीसी सिगारेट कंपनीचे डिलर डंबीर ऍण्ड सन्स प्रा.लि. या फर्मकडे ते सिगारेट विक्रीचे काम करतात.