हमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- अहमदनगर मधील संयुक्त किसान मोर्चा, किसान सभा, शेतमजूर व कामगार संघटनांच्या वतीने देशभर काळा दिवस पाळण्यात आला.
नगर जिल्ह्यातील शेतकरी आणि कामगार संघटना यामध्ये सहभागी झाल्या होत्या. जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांनी घरांवर, गाड्यांवर, ट्रॅक्टरवर काळे झेंडे लावून निदर्शने केली.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला साथ देण्यासाठी आपल्या घरावर काळे झेंडे फडकावत मोदी सरकारच्या कामगार व शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्याचे आवाहन विविध संघटनांतर्फे करण्यात आले होते.
त्यानुसार हे आंदोलन झाले. यासंबंधी किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी सांगितले की, ‘शेतकरी आणि कमगार विरोधी धोरणे घेणाऱ्या
केंद्र सरकारला करोनाची परिस्थिती हाताळण्यातही अपयश आले आहे. सरकारने करोना परिस्थिती ज्या निष्काळजीपणाने हाताळली व लसीकरणाचा खेळखंडोबा केला त्याचाही देशभर घरांवर काळे झेंडे फडकवून निषेध करण्यात आला.’