अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- बंदी असताना ही बाजार भरल्याचे समजताच पोलिसांनी बाजारात जाऊन बाजार बंद केला; मात्र एका गाव पुढाऱ्याने पोलिसाला माफी मागण्यास भाग पाडले. परंतु नंतर याच ठिकाणी अपघात झाला व एका महिलेला आपला जीव गमवावा लागला.
या बाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर- नेवासा मार्गावर बाजार भरल्याचे समजताच पोलिसांनी बाजारात जाऊन बाजार बंद केला; मात्र येथील एका गाव पुढाऱ्याच्या मुलाने पोलासांबरोबर आरेरावीची भाषा केल्याने पोलिसांनी या मुलास चोप दिला.
त्यामुळे या मुलाने पुढारी असलेल्या वडिलांना बोलावून घेतले. त्यानंतर या पुढाऱ्याने राजकीय दबाव आणून पोलिसाला धारेवर धरले व पोलिसाला माफी मागण्यास भाग पाडले. त्यामुळे पोलीस बाजारातून निघून गेले.
त्यामुळे पुन्हा बाजार भरला व ही दुर्घटना घडली. बाजार बंद करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश असतानाही बाजार भरला होता.
त्यामुळेच ही घटना घडल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली. तरी तो गाव पुढारी कोण आहे व आता त्याच्यावर काय कारवाई होते याकडे लक्ष वेधले आहे.