ग्रामपंचायत सदस्याकडून अंगणवाडी सेविकेस मारहाण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- ग्रामपंचायत सदस्याकडून अंगणवाडी सेविकेस मारहाण झाल्याची घटना अकोले तालुक्यातील पिंपळदरावाडी येथे घडली आहे.

याप्रकरणी अंगणवाडी सेविका चहाबाई पांडुरंग भांगरे यांनी फिर्याद दिली असून पिंपळदरावाडी येथील ग्रामपंचायत सदस्य साहेबराव भगवंता भांगरे याचेविरुद्ध राजूर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, ग्रामपंचायत सदस्य साहेबराव भांगरे याने अमृत आहार योजनेचे आलेले पैसे न देता व बहीण सरपंच असताना याच बहिणीच्या नावाने खोट्या सह्या करून पैसे काढत असून मला नेहमी त्रास देऊन मारहाण करतो. या इसमापासून माझ्या जिविताला धोका असून त्याने मला अंगणवाडीत येऊन मारहाण केली.

त्यामुळे संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी अशी फिर्याद राजूर पोलिसांकडे पिंपळदरावाडी येथील अंगणवाडी सेविका सौ. चहाबाई पांडुरंग भांगरे यांनी दिली.

साहेबराव भांगरे याने एकेदिवशी अंगणवाडीत येऊन मला मारहाण केली. 15 ऑगस्ट रोजी ग्रामसभा बोलावली तर तो पळून गेला.

या व्यक्तिपासून माझ्या जिवितास धोका असून मला अंगणवाडीत येऊन दमबाजी करतो असे या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी राजूर पोलीस ठाण्यात आरोपी साहेबराव भगवंता भांगरे याचेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24