Maharashtra news : मनी लाँड्रिंग प्रकरणात सीबीआय कोठडीत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांचा रक्तदाब वाढला आहे, तसेच, त्यांची स्ट्रेस थिलियम हार्ट टेस्ट करायची असल्याने त्यांना मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
केईएम रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तब्बल शंभर कोटी रुपये वसुलीच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात देशमुख यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर त्यांना अद्यापही जामीन मिळालेला नाही.