ताज्या बातम्या

दुभत्या जनावरांची खरेदी कशी करावी ? जाणून घ्या, प्राणी खरेदी करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Animal husbandry Business : शेतीबरोबर किफायतशीर नफा मिळवून देणारा व्यवसाय म्हणजे दुग्धव्यवसाय. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी पशुपालन हा उत्तम व्यवसाय आहे.

पशुपालन हा एक कृषी व्यवसाय आहे जो भूमिहीन शेतकरी करू शकतात. पशुपालन करून शेतकऱ्यांना दूध तसेच शेणखत मिळते.

जनावरे खरेदी करताना योग्य काळजी घेतली नाहीतर शेतकऱ्यांना मोठा तोटा होऊ शकतो. हा तोटा होऊ नये म्हणून जनावरे खरेदी करताना योग्य काळजी कशी घ्यावी लागते तेच आज आपण पाहणार आहोत.

प्राण्याच्या दातांवरून वयाचा अंदाज लावणे
दातांवरून तुम्हाला अचूक वय कळू शकते, दातांची पहिली कायमची जोडी दोन वर्षांच्या वयात तयार होते.
दुसरी जोडी चौथ्या वर्षाच्या शेवटी उगवते, जनावर सहा वर्षाचे झाले असेल तर पाठीमागील दोन दात पडलेले असतात.

आरोग्य चाचणी
डोळे तेजस्वी आणि निर्दोष हवेत. आजूबाजूच्या लोकांबरोबर विचारपूस करून रोग, लसीकरणा बाबत विचारपूस करून घ्यावी. जनावर हे दरवर्षी वासरांना जन्म देणारं असायला पाहिजे. त्याचा कोणत्याही प्रकारचा गर्भपात झालेला नसावा. दुस-या किंवा तिसर्‍या वेताचाच प्राणी विकत घ्या

दूध क्षमता
जनावराचे दूध तीनदा काढण्याचा प्रयत्न करा, व्यापारी हुशार चालबाज असतो. तो तुम्हाला एकदाच दूध काढून दाखवतो. दूध पातळ आहे का घट्ट ते पाहावे. दुधामध्ये फॅटचे प्रमाण कितीत असेल याचा अंदाज घ्यावा. मोठ्या कासेचे जनावर घ्यावे. योग्य दुधाळ वंशावळ निवडणे.

शिंगावरून वयाचा अंदाज लावणे
वयाच्या 3 ऱ्या वर्षी प्राण्याच्या शिंगावर पहिली रिंग तयार होते
यानंतर दरवर्षी एक रिंग तयार होते.
शिंगावरील रिंगाच्या संख्येवरून प्राण्याचे वय शोधता येते.

कासाची पाहणी कशी करावी
खरेदी करताना, कासेचे बारकाईने निरीक्षण करा, जेणेकरून कासेमध्ये गुठळ्या, सूज असेल तर आढळून येईल.
पोट फुगणे, कास फुगलेले जनावरे विकत घेऊ नका.
अशा प्रकारे, आपण फसवणूक आणि नुकसान टाळू शकता.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24