Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Ank Rashifal April 2023 : एप्रिल महिना आहे ‘या’ तारखांना जन्मलेल्या लोकांसाठी खूपच खास, मिळणार करिअरमध्ये चांगले यश

एप्रिल महिना हा करिअर आणि आर्थिक भरभराटीसाठी या चार तारखांना जन्मलेल्या लोकांसाठी खूप शुभ आहे. तुम्हाला या महिन्यात चांगले परिणाम पाहायला मिळतील.

Ank Rashifal April 2023 : पुढचा महिना म्हणजेच एप्रिल महिना हा काही तारखांना जन्मलेल्या लोकांसाठी खूपच खास आहे. हा महिना तुमचे करिअर आणि व्यवसायाच्या आलेखाची उंची गाठू शकतो. त्यांच्या मनातील प्रत्येक ईच्छा या महिन्यात पूर्ण होऊ शकते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

ज्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्यात आणि वर्षात काही ठराविक तारखेला झाला असेल त्या व्यक्तींच्या आयुष्यात हा महत्त्वाचा बदल होऊ शकतो. या लोकांना करिअरमध्ये उत्तम यश मिळेल. तसेच त्यांना परदेशात नोकरी करण्याची संधी मिळेल. इतकेच नाही तर त्यांचे लव्ह लाईफ आणि वैवाहिक जीवन चांगले असणार आहे.

कसे असेल आरोग्य?

राहू आणि केतू 05 आणि 06 रोजी जन्मलेल्या लोकांच्या आरोग्यात समस्या निर्माण करण्याची शक्यता आहे. तसेच जन्म क्रमांक 08 असणाऱ्या लोकांनी आरोग्याबाबत जागरूक असणे गरजेचे आहे. जन्म क्रमांक 09 च्या लोकांना हाडे आणि बीपीच्या समस्या असण्याची दाट शक्यता आहे. जन्म क्रमांक 03 असणाऱ्या लोकांना शुगर आणि बीपीचा त्रास होऊ शकतो.

नोकरी आणि व्यवसाय

जन्मतारीख 07 आणि 09 असणाऱ्या एमबीए आणि तांत्रिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना खूप मोठे यश मिळू शकते. जन्मतारीख 04 आणि 06 क्रमांकाच्या लोकांना ऑफिसमधून परदेशात जाण्याची एक उत्तम संधी मिळेल. 03, 06, 08 आणि 09 रोजी जन्मलेल्या लोकांना 15 एप्रिल नंतरचा काळ आयटी, मीडिया आणि व्यवस्थापन क्षेत्रासाठी खूप चांगला राहणार आहे.

तसेच रवि 01 जानेवारी रोजी पदोन्नती किंवा नोकरी बदलण्याच्या संधी निर्माण करू शकतो. चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीशी निगडित असणाऱ्या लोकांना याचा खूप मोठा फायदा होईल. या लोकांना व्यवसायात खूप मोठे यश मिळेल. त्यासाठी श्री सूक्ताचे पठण करत राहणे गरजेचे आहे.

कसे असेल लव्ह लाईफ आणि वैवाहिक जीवन

06 आणि 07 रोजी जन्मलेल्या लोकांचे प्रेम जीवन यशस्वी होऊ शकते. जन्म क्रमांक 09 असणाऱ्या लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहणार आहे. जन्म क्रमांक 07 असणाऱ्या लोकांना जीवनसाथीच्या आरोग्याबाबत समस्या निर्माण होऊ शकतात. प्रेम विवाहाचे रूप घेऊ शकतो, यासाठी हा काळ चांगला राहील. तसेच जन्म क्रमांक 05 आणि 08 असणाऱ्या लोकांसाठी लव्ह लाइफ काळ चांगला राहू शकतो.

कशी असेल आर्थिक स्थिती

04, 06 आणि 08 जन्म क्रमांक असणाऱ्या लोकांना हा महिना खूप पैसा आणि संपत्ती देण्याची शक्यता आहे. जन्म क्रमांक 05 असणाऱ्या लोकांसाठी वाहन आणि घर खरेदीचे संयोजन आहे. जन्म क्रमांक 03 आणि 09 असणाऱ्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहू शकते.

त्यासाठी करा हा उपाय

त्यासाठी दररोज श्री सूक्ताचे पठण करणे खूप गरजेचे आहे. इतकेच नाही तर बुधवारी भैरोची पूजा करा. उडीद आणि तीळ दान करत राहावे. तुमच्या मोठ्या भावाचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घ्या. सर्वात शेवटी प्रत्येक बुधवारी गणपतीला दुर्वा आणि मोदक अर्पण करत जा.