नगर-पुणे ट्विनसिटीत रुपांतर होण्याकरिता शिवजयंती दिनी स्वयंसेवी संघटनांची लोकचळवळीची घोषणा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:- शहराचा सर्वांगीन विकास साधण्यासाठी नगर-पुणे ट्विनसिटीत रुपांतर होण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी शुक्रवारी 19 फेब्रुवारीला स्वयंसेवी संघटनांच्या वतीने लोकचळवळीची घोषणा केली जाणार आहे.

रेल्वे स्टेशन रोड येथील लोखंडी पुल येथे सकाळी 11:30 वाजता राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार डॉ. सुजय विखे, आमदार संग्राम जगताप व महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते फीत कापून या चळवळीची सुरुवात केली जाणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

सर्वसामान्य जनतेच्या पुढाकारातून ही लोकचळवळ उभी राहत आहे. शिवजयंती दिनी इतिहास साक्षी सुर्यनामा करुन अलेक्झांडर से सवाई महान शिवाजी ही घोषणा दिली जाणार आहे. नगर-पुणे शहरांना जुळ्या शहरांचा दर्जा प्राप्त करुन देण्यासाठी व नगर शहरातील औद्योगिक, व्यापार, रोजगार व विकासाला चालना देण्यासाठी शहरातील स्वयंसेवी संघटनांनी पुणे-नगर-शिर्डी शटल रेल्वे सेवा सुरु करण्याची मागणी लाऊन धरली आहे.

ही लोकचळवळ उभी राहण्यासाठी राजकीय पुढारी व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याची अपेक्षा असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. नगर-पुणे ट्विनसिटीत रुपांतर होण्याकरिता व पुणे-नगर-शिर्डी शटल रेल्वे सेवा कार्यान्वीत करण्यासाठी हरजितसिंह वधवा, अर्शद शेख, अ‍ॅड. कारभारी गवळी, सुहास मुळे, जालिंदर बोरुडे, संजय सपकाळ,

अशोक सब्बन, रमेश बाफना, धनेश बोगावत, ए.बी. बोरा, दत्तात्रय गायकवाड, अन्वर सय्यद, हुसेन सय्यद, जयकुमार मुनोत, राजेंद्र पडोळे, कैलास दळवी, बहिरुनाथ खंडागळे, जयराम मल्लिकार्जुन, सुवालाल ललवाणी आदी प्रयत्नशील आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24