संतापजनक : पित्यानेच केला मुलीवर अत्याचार !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- मागील काही दिवसापासून श्रीरामपूर तालुक्यात खून, अपहरण, दरोडा यासारख्या घटना घडत आहेत. मात्र आता तर चक्क पित्यानेच आपल्या दहा वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची अत्यंत संतापजनक घटना  श्रीरामपूर तालुक्‍यातील निमगाव खैरी येथे घडली आहे.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. यासंदर्भात पिडीतेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिस ठाण्यात पिडीतेच्या वडीलांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर असे की,  तालुक्‍यातील निमगाव खैरी परिसरात एका पोल्ट्रीफार्मवर कामासाठी एक परप्रांतीय कुटुंब वास्तव्यास आहे.

याच कुटुंबात हा प्रकार झाला. शुक्रवारी सायंकाळी सात वाजता पोल्ट्री फार्मसमोरील घरामध्ये  २७ वर्षीय पित्याने स्वत:च्या दहा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

पिडीतेच्या आईने तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी पिडीतेच्या पित्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यास तातडीने अटक केली. पोलिसांनी येथील न्यायालयात आरोपीला हजर केले.

न्यायालयाने आरोपीला पुढील तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. याबाबत पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अतुल बोरसे करीत आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24