ताज्या बातम्या

Infinix Note 12i : अखेर लाँच झाला आणखी एक बजेट स्मार्टफोन, किंमत आहे…

Published by
Ahmednagarlive24 Office

Infinix Note 12i : Infinix च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण कंपनीने आपला नवीन Infinix Note 12i हा स्मार्टफोन लाँच केला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीचा हा बजेट स्मार्टफोन असणार आहे. ज्याची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा खूपच कमी आहे.

जर तुम्हीही बजेट स्मार्टफोन खरेदी करणार असाल किंवा खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. कंपनीने आपल्या नवीन फोनमध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसरसह 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज दिलेले आहे.

इतकी असणार किंमत

स्मार्टफोनची किंमत 9,999 रुपये इतकी आहे. कंपनीचा हा फोन फोर्स ब्लॅक आणि मेटाव्हर्स ब्लू अशा कलरमध्ये खरेदी करता येईल. तुम्ही फ्लिपकार्टवरून हा फोन 30 जानेवारीपासून विकत घेऊ शकता.

स्पेसिफिकेशन

हा XOS 12.0 Android 12 सह येतो. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले दिला असून ज्याची कमाल ब्राइटनेस 1000 निट्स आहे. यात डिस्प्लेसह गोरिल्ला ग्लास 3 संरक्षण देण्यात आले आहे. स्टोरेजचा विचार केला तर यामध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसरसह 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज दिले आहे.

असा असणार कॅमेरा

कंपनीच्या या फोनमध्ये तीन रियर कॅमेरे आहेत, ज्यात प्राथमिक लेन्स 50 मेगापिक्सेल असून, ज्यामध्ये अपर्चर f/1.6 आहे. दुसरी लेन्स 2 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहे आणि तिसरी लेन्स QVGA आहे. तर या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे ज्यासोबत ड्युअल एलईडी फ्लॅश लाइट आहे. एवढेच नाही तर कॅमेरासोबत अनेक मोड उपलब्ध असणार आहेत.

अशी मिळेल बॅटरी

यामध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 4G, Wi-Fi, Bluetooth 5.0, GPS आणि USB Type-C पोर्ट उपलब्ध असणार आहे. तर फिंगरप्रिंट सेन्सर व्यतिरिक्त, फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Ahmednagarlive24 Office