ताज्या बातम्या

Maxima Max Pro Shogun : लाँच झाले आणखी एक जबरदस्त फीचर्स असणारे स्मार्टवॉच, किंमत आहे फक्त इतकी

Published by
Ahmednagarlive24 Office

Maxima Max Pro Shogun : सध्याच्या काळात ग्राहकांना आधुनिक तंत्रज्ञान आणि जबरदस्त फीचर्स असणारे स्मार्टवॉच वापरायला आवडत आहे. त्यामुळे कंपन्याही त्यांच्या मागणीसाठी तसे स्मार्टवॉच लाँच करत आहेत.

अशातच आता मॅक्सिमा कंपनीने आपले नवीन स्मार्टवॉच मॅक्सिमा मॅक्स प्रो शोगुन लाँच केले आहे. कमी किमतीत यात उत्तम फीचर्स मिळत आहेत. आधुनिक तंत्रज्ञान असणारे मॅक्स प्रो शोगुन स्मार्टवॉच भारतात लाँच झाले आहे. यामध्ये अनेक उत्तम फीचर्ससह दिली आहे.

किंमत

मॅक्सिमाच्या स्मार्टवॉच सीरिजमधील ही नवीन जोड ऑइल फिनिशसह प्रिमियम डिझाइनची असून किंमत केवळ 1799 रुपये इतकी आहे. जर तुम्हाला हे आधुनिक तंत्रज्ञान असणारे स्मार्टवॉच विकत घ्यायचे असेल तर तुम्ही ते कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन घेऊ शकता.

स्पेसिफिकेशन

कंपनीने यामध्ये १.८५ एचडी डिस्प्ले दिला आहे. तो 91 टक्के स्क्रीन-टू-बॉडी, 550 निट्स ब्राइटनेस आणि अल्ट्रा-ब्राइट स्क्रीनसह आहे. यात स्मार्ट-कंट्रोल कॅमेरा, म्युझिक सिस्टीम, डीएनडी, पॉवर सेव्हर आणि सोशल मीडिया नोटिफिकेशन्स यांसारखी फीचर्सही कंपनीने दिली आहेत. ‘फाइंड माय फोन’, हवामान अपडेट्स, कॅल्क्युलेटर इत्यादी फीचर्सचा समावेश आहे.

सर्वोत्तम फीचर्स

हे स्मार्टवॉच योग रेकॉर्डसह अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह आहे. यात एकूण 120 पेक्षा जास्त स्पोर्ट मोड आहेत. हॅमस्टर, बॅटलशिप, फोर इन-बिल्ट गेम्स, फ्लॉपी, एचआर/एसपीओ2/ स्लीप मॉनिटरिंग यांसारखे जबरदस्त फिचर्स आहेत.

इतकेच नाही तर या यामध्ये कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी तणाव व्यवस्थापनासाठी श्वासोच्छवासाच्या व्यायामाला मदत करणारी फीचर्स दिली आहेत. तर वॉटर ड्रिंक रिमाइंडर, अलार्म, स्टेप्स काउंटिंग, स्टॉपवॉच, टॉर्च, टाइमर आणि पीरियड ट्रॅकर यांसारखी असणार आहेत ज्यांचा तुम्ही Maxima SmartFit अॅपद्वारे लाभ घेऊ शकता.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office