जिल्ह्यात म्युकर मायकोसिसने घेतला आणखी एक बळी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- कोरोना पाठोपाठ जिल्ह्यात म्युकर मायकोसिस या आजाराने शिरकाव केला आहे. नुकतेच जिल्ह्यातील अनेक ठिकाणी या आजराचे रुग्ण आढळून येऊ लागले आहे.

नुकतेच देवळाली प्रवरा मध्ये म्युकरमायकोसिसच्या रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर दुसरीकडे देवळाली प्रवरा मध्ये म्युकरमायकोसिसचा आणखी एक रुग्ण सापडला असून त्याच्यावर राहाता येथील एका खासगी हास्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

देवळाली प्रवरातील एका 52 वर्षीय व्यक्तीस करोनाची लागण झाली होती. करोनावर उपचार घेतल्यानंतर तो पूर्णपणे बरा झाला होता. दोन दिवसापूर्वी म्युकरमायकोसिसचे लक्षण त्या रुग्णास दिसू लागल्याने उपचार घेण्यासाठी त्यास एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

रुग्णालयात उपचार चालू असताना गुरूवारी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. दुसरा रुग्ण 30 वर्षीय तरुण असून त्याच्यावर राहाता येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

उपचारानंतर त्याची पुन्हा प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर तो तरुण पूर्णपणे बरा झाला की नाही? हे समजणार आहे.

देवळाली प्रवरा परिसरात करोनापाठोपाठ म्युकरमायकोसिस आजारचे रुग्ण वाढू लागले आहेत. करोनातून बरे झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिस आजाराची लक्षणे मोठ्या प्रमाणात जाणवू लागले आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24