अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- कोरोनाच्या म्यु नावाच्या या व्हेरिएंटमध्ये लस किंवा संसर्गातून तयार झालेल्या अँटीबॉडिजला चुकवण्याची क्षमता आहे. त्याबाबत अद्याप पुरेसे अध्ययन झालेले नाही. जगभरात कोरोना विषाणूचे नवे व्हेरिएंट समोर आले आहेत.
त्यांच्यामुळे संसर्गाचे प्रमाण वाढत चालले आहे. म्यू नावाच्या कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिएंटची निगराणी करत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. हा व्हेरिएंट पहिल्यांदा जानेवारीत कोलंबियात आढळला होता. व्हेरिएंटचे शास्त्रीय नाव बी.वन. सिक्सटूवनच्या रूपात वर्गीकृत करण्यात आले आहे.
संयुक्त राष्ट्राच्या म्हणण्यानुसार कोरोनामुळे अनेक देशांतील सरकारला आपल्या जनतेला सेवा देण्याची प्रेरणा मिळाली आहे. परंतु वास्तवात जगातील निम्म्या लोकसंख्येकडे सामाजिक सुरक्षा नाही. जागतिक संस्थेच्या सामाजिक सुरक्षेच्या स्थितीवरील एका अहवालात ४१० कोटी लोकांकडे सामाजिक सुरक्षा नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
वृद्धावस्था, बेरोजगारी, आजारपण, अपंगत्व, कामावर असताना जखम, मातृत्व, कुटुंबातील कर्त्याचे निधन, मुलांच्या बाबतीत आरोग्य देखभालीपर्यंतची पोहोच, सामाजिक सुरक्षा व उत्पन्नाची वाईट परिस्थिती इत्यादी महत्त्वाचे ठरते.
२०२० मध्ये जागतिक लोकसंख्येपैकी केवळ ४६.९ टक्के लोकांना अशी सामाजिक सुरक्षा मिळू शकली. उत्तर कोरियाने आपल्याला मिळालेल्या २९ लाख ७० हजार डोसपैकी काही डोस इतर गरजू देशांना देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. चीननिर्मित सिनोवॅक लस देण्यात येईल, असे कोरियाने जाहीर केले आहे.