मुरूम चोरणाऱ्यांना सोडून अधिकारी ग्रामस्थांवरच संतापले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :-  नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती शिवारातील नदीकाठच्या देवस्थान इनामी असलेल्या सरकारी मालकीच्या जमिनीतून सु]मारे 150 ब्रासहून अधिक मुरूमाचे बेकायदा उत्खनन करून गौण खनिज चोरून नेण्यात आल्याची तक्रार जेऊर हैबती ग्रामस्थांनी नेवाशाच्या तहसिलदारांकडे करण्यात आली होती.

त्यानंतर तहसीलदारांच्या आदेशानुसार मंडल अधिकारी व तलाठी यांनी सदर उत्खनन केलेल्या जागेचा पंचनामा केला.

मात्र यावेळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांना या महसूल कर्मचाऱ्यांनी त्याच वेळेस आम्हाला सांगायचे ना…याचे कानफाड फोडा ओ” अशी अत्यन्त हीन भाषा वापरली आहे.

जेऊर हैबतीत म्हस्के, घुगरे वस्ती लगतच रामबाबा देवस्थानच्या भोवतलाच्या नदीकाठाजवळचा मुरूम जेसीबी व ट्रॅक्टरट्रॉल्यांतून नेण्यात आला आहे. त्यासाठी सरकारी जमिनीत सहा ते सात फुटांपर्यंत खड्डे करण्यात आले आहेत.

ग्रामस्थांकडेे मुरूमाची चोरी करणारे जेसीबी यंत्र व ट्रॉल्यांचीही नावानिशी छायाचित्रे पुराव्यानिशी उपलब्ध आहेत. सरकरी जागेवरील मुरूमाचे बेकायदा उत्खनन व वाहतूक सुरू असताना काही ग्रामस्थांनी गावच्या तलाठी व ग्रामसेवकास या चोरीची माहिती दिली.

मात्र तलाठी व ग्रामसेवकाने याकडे गांभिर्याने न बघता दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांनी याबाबतची तक्रार तहसीलदारांकडे केली.

त्यानंतर महसूल यंत्रणा खबडून जागी झाली. मंगळवार दि.29 रोजी कुकाणा विभागाचे मंडल अधिकारी व तलाठी यांनी सदर उत्खनन झालेल्या जागेचा पंचनामा केला आहे.

मात्र यावेळी उपस्थित असलेले ग्रामस्थ माहिती देत असतांना महसूल कर्मचारी त्यांना म्हणाले,”त्याच वेळेस आम्हाला सांगायचे ना….याचे कानफाड फोडा ओ” अशी अत्यन्त हीन भाषा वापरली.त्याचा व्हिडीओ ग्रामस्थांनी पत्रकारांना दिला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24