उच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली केल्याप्रकरणी तहसिलदारांच्या विरोधात श्रीगोंदा प्रांतापुढे अपील दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपिठाने जमीन हस्तांतरणाला स्थगिती दिली असताना सुध्दा श्रीगोंदा तहसिलदाराने जमीन इतर व्यक्तींच्या नावावर करुन उच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली केली असल्याचा आरोप तक्रारदार जिजाबा रखमाजी वागस्कर यांनी केला आहे.

या प्रकरणी त्यांनी तहसिलदारांच्या विरोधात श्रीगोंदा प्रांतापुढे अपील दाखल केली असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

श्रीगोंदा तालुक्यातील सुरोडी येथे जिजाबा रखमाजी वागस्कर यांची गट नं. 140 मध्ये 6 हेक्टर 98 आर जमीन आहे. सदर जमीनीचा वाद सुरु असताना जिजाबा यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात दुसरी अपील 458/2010 ही 21 जुलै 2010 रोजी दाखल केली.

औरंगाबाद खंडपिठाने जिल्हा न्यायालय व श्रीगोंदा न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देऊन जमीन हस्तांतरणास स्थगिती दिली.

हा वाद श्रीगोंदा न्यायालयात सुरु असताना श्रीगोंदा तहसिलदार यांनी सोजाबाई काशीनाथ वागस्कर, मीराबाई बलभीम गलांडे यांच्या अर्जावरुन या जमीनीपैकी 5 हेक्टर 24 आर जमीन अर्जदाराच्या नावे करुन टाकली.

जमीन मालक जिजाबा वागस्कर यांचा जमीनीवर ताबा व मालकी हक्क असतानासुध्दा ही जमीन इतरांच्या नावे वर्ग करण्यात आली. यासंबंधी मुळ जमीन मालकांना नोटीस देखील देण्यात आली नसल्याचा आरोप तक्रारदार जिजाबा वागस्कर यांनी केला आहे.

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात या जमीनीचा वाद प्रलंबीत असताना, दुसरे अपील 459/2010 द्वारे चुकीची एका तांत्रिक मुद्दयावर तहसिलदाराने इतर व्यक्तींच्या नावे जागा वर्ग करण्याचा हुकुम काढला आहे.

या संदर्भात जिजाबा यांनी श्रीगोंदा प्रांतपुढे अपील दाखल केले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24