अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-जिल्हयातील महाविद्यालयांमध्ये प्रवेशीत मागासवर्गीय (अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग) विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, सन 2020-21 या शैक्षणिक वर्षाकरीता दिनांक 3 डिसेंबर 2020 पासून mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ सुरु करण्यात आलेले आहे.
तथापी सदर संकेतस्थळावर गेल्यावर्षीच्या तुलनेत अनुसूचित जाती प्रवर्गाचे केवळ 53 टक्के तर विजाभज इमाव व विमाप्र प्रवर्गाचे केवळ 60 टक्के अर्ज भरले गेले आहेत.
त्यामुळे विहीत मुदतीत विद्यार्थ्यांनी अर्ज भरावेत. तसेच अहमदनगर जिल्हयातील सर्व महाविद्यालयांना सुचित करण्यात येते की,
आपल्या महाविद्यालयात प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याकरीता आपण स्वत: विशेष सुविधा उपलब्ध करुन द्यावी.
याबाबत आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य पुणे हे स्वत: जिल्हानिहाय आढावा घेणार आहेत.
त्यामुळे सदर बाबीस प्राधान्य देण्यात यावे, असे समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी कळविले आहे.