अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- कोरोना हा अदृश्य शत्रू आहे .त्याला पूर्णपणे घालविण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. लॉकडाउनच्या शिथिलते नंतर काहीशी वाढणारी गर्दी अत्यंत चिंताजनक आहे.
यातून करोना चा प्रादुर्भाव वाढू शकतो. असे प्रतिपादन करतच कोरोनामुक्त गाव अभियानात सर्वानी सहभाग घ्यावा असे आवाहन ज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यावर आयोजित गावच्या प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी बोलताना थोरात म्हणाले कि, राज्यातील शहरी भागातील करोना आटोक्यात येत असून ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढ पूर्णपणे रोखण्यासाठी सर्व गावांतील नागरिकांनी पुढाकार घेत राज्य सरकारने सुरू केलेल्या
करोना मुक्त गाव अभियानात सहभाग घ्यावा व लवकरात लवकर आपले गाव , तालुका, जिल्हा व राज्य पूर्ण करोना मुक्त करण्यात आपले योगदान द्यावे. पुढे बोलताना थोरात म्हणाले, राज्याने केलेल्या कोरोना बाबतच्या उपाययोजनांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आहे.
माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मी जबाबदार या अभियानांतर्गत गावोगावी नागरिकांची तपासणी झाली. जास्त तपासणी मुळे रुग्णसंख्या काही काळ वाढलेली दिसली मात्र यातून त्या नागरिकांवर तातडीने उपचार करणे शक्य झाले.
राज्य सरकारने सुरू केलेल्या करोना मुक्त गाव अभियानात प्रत्येक गावांनी सहभाग घ्यावा. यामुळे प्रत्येक गाव करोना मुक्त होऊन आपला तालुका कोरोना मुक्त होईल. त्यानंतर जिल्हा, राज्य व आपला देश ही करोना मुक्त होईल.