साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती साठी अर्ज करण्याचे आवाहन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :- सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात इ. 10 वी, 12 वी, पदवी, पदयुत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी आदी अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सरासरी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारीने गुण प्राप्त करुन उत्तीर्ण झालेल्या मातंग समाज व तत्सम पोटजातीतील विद्यार्थी विद्यार्थिनींना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ यांच्याकडून जेष्ठता व गुण क्रमांकानुसार जिल्हयातील प्रथम 3 ते 5 विद्यार्थ्यांना उपलब्ध निधीच्या अधीन राहून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते.

यासाठी दिनांक 12 ऑगस्ट 2021 च्या आत संबंधितांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे. मातंग आणि त्यामधील मांग, मातंग, मिनीमादिग, मादिंग, दाखनीमांग, मांगमहाशी, मदारी, राधेमांग, मांगगारुडी, मांगगारोडी, मादगी, मादिगा या पोटजातीतील विद्यार्थी विद्यार्थिनींना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येतो.

जातीचा दाखला, फोटो, मार्कशिट, शाळा सोडल्याचा दाखला, रेशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड, पुढच्या वर्गात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट व जिल्हा व्यवस्थापकांच्या नावे शिष्यवृत्ती मागणीचा अर्ज इ.मूळ कागदपत्रे दोन प्रतीत आणावीत.अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24