खुशखबर ! कृषिपंपांना सौरऊर्जेद्वारे दिवसा वीजपुरवठा होतोय उपलब्ध

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- पारंपरिक पद्धतीने कृषिपंपाची वीजजोडणी न झालेले व महावितरणकडे वीजजोडणीसाठी पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषिपंपांना सौरऊर्जेद्वारे दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून पारेषणविरहित नवीन वीजजोडण्या देण्यात येत आहे.

शेतकर्‍यांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून गती देण्यात आली आहे. यात नगर जिल्ह्यातील 2 हजार 569 सौर कृषिपंपाचा समावेश आहे, या सर्व शेतकर्‍यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध झाला असून वीजबिलांतून देखील मुक्तता झाली आहे.

या योजनेमध्ये अतिदुर्गम व आदिवासी भागातील शेतकर्‍यांना प्राधान्य देण्यात येत आहे. त्यासाठी सौर कृषिपंपाच्या आधारभूत किंमतीपैकी सर्वसाधारण गटासाठी 10 टक्के तर अनुसूचित जाती/जमाती गटातील शेतकर्‍यांसाठी 5 टक्के लाभार्थी हिस्सा आहे.

सौर कृषिपंपांद्वारे शेतकर्‍यांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध झाला आहे. यासोबतच शेतकर्‍यांची वीजबिलातून मुक्तता झाली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24