अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-अठरा पगड जाती जमाती मधील सवंगड्यांना एकत्रिक करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे पावित्र्य आणि रक्षण करण्याची जबाबदारी युवाशक्तीने कर्तव्य भावनेतून स्विकारली पाहीजे असे प्रतिपादन भाजपाचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ व्या जयंतीदिनी प्रवरा उद्योग समूहाच्या वतीने कोव्हीडच्या सर्व नियमांचे पालन करुन प्रवरानगर येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.आ.विखे पाटील यांच्यासह संस्थाच्या पदाधिकार्यानी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
डॉ विखे पाटील कारखान्याचे व्हा.चेअरमन विश्वासराव कडू, संचालक भारत तांबे, संजय आहेर, स्वप्नील निबे, कार्यकारी संचालक ठकाजी ढोणे यांच्यासह सर्व संचालक, अधिकारी, कामगार याप्रसंगी उपस्थित होते. अभिवादन सोहळ्याच्या निमित्ताने लोणी आणि परिसरातील गावांमध्ये युवकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना आ.विखे पाटील यांनी भेटी देवून या जयंती दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रमात सहभाग घेतला.
लोणी बुद्रुक आ.विखे पाटील यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.धनश्रीताई विखे पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत पालखीची मिरवणूक काढण्यात आली, मल्लखामांच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन यानिमित्ताने करण्यात आले होते. यावेळे पंचायत समितीचे माजी उपसभापती सुभाषराव विखे, माजी उपसरपंच अनिल विखे, सरपंच सौ.कल्पना मैड, उपसरपंच गणेश विखे, रामभाऊ विखे, राहुल धावणे,
भाऊसाहेब विखे, गणेश विखे, लक्ष्मण विखे, संतोष विखे, शंकर विखे, प्रा.भाऊसाहेब विखे, लोणी खुर्द येथील कार्यक्रमास शांतीनाथ आहेर, संजय आहेर, सचिन आहेर, बापूसाहेब आहेर, धंनजय आहेर, भारत घोगरे, मंगेश आहेर, रविराज आहेर यांच्यासह ग्रामस्थ, शिवभक्त, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोणी खुर्द येथे छत्रपती शासन या संघटनेच्या वतीनेही शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला होता. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शस्त्रांचे पुजन करण्यात आले. ऐतिहासिक खेळांचे प्रात्यक्षिकांचे आयोजनही यावेळी करण्यात आले होते.
याप्रसंगी बोलताना आ.विखे पाटील म्हणाले की,शिवाजी महाराजांच्या जन्म दिनाला तीनशे एक्कावन्न वर्ष झाली. पण या दिवसाचे महत्व देशाने ऐतिहासिक क्षणाप्रमाणे जपले आहे. छत्रपतींनी स्वराज्य स्थापन करताना समाजातील प्रत्येक घटकांना बरोबर घेतले, यातूनच रयतेचे राज्य निर्माण झाले.
आज शिवाजी महाराजांनी केलेल्या ऐतिहासिक लढाईचे साक्षीदार हे राज्यातील गड किल्ले आहेत. या वास्तूचे जतन करून पावित्र्य राखणे हे आपले कर्तव्य असल्याचे नमूद करुन आ.विखे पाटील म्हणाले की, गड किल्ल्यांबरोबरच महाराजांनी मिळवून दिलेल्या स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन आ विखे पाटील यांनी केले.