Apple Car: मार्केटमध्ये खळबळ ! ‘या’ दिवशी लॉन्च होणार ऍपलची नवीन कार ; किंमत आहे फक्त ..

Apple Car: मार्केटमध्ये पुन्हा एकदा Apple मोठा धमाका करण्याची तयारी करत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो Apple ने एक मोठा निर्णय घेतला आहे. सध्या या निर्णयामुळे अनेक कंपन्यांची धाकधूक देखील वाढली आहे.

कंपनी यावेळी आयफोन किंवा लॅपटॉप नाहीतर चक्क कार लाँच करण्याची तयारी करत आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार Apple आपली नवीन कार काही ठराविक मार्केटसाठी तयार करत आहे. याच बरोबर कंपनी इतर कारच्या तुलनेत आपल्या कारची किंमत देखील कमी ठेवू शकते. ज्यामुळे कंपनीला मर्सिडीज, टेस्ला, जीएम हमर ईव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक सेडानला टक्कर देता येणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Apple कार तपशील

मर्सिडीज आणि टेस्लाला टक्कर देण्यासाठी येणाऱ्या अॅपलच्या मस्त कारमध्ये अॅपल सिलिकॉन चिपसेट वापरण्यात येणार असल्याचे मानले जात आहे. रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की हा चिपसेट अॅपलच्या चार हाय-एंड MAC चिप्सच्या बरोबरीचा असेल. कंपनीचे सिलिकॉन अभियंते ते विकसित करतील.

Apple कारमध्ये काय असेल खास?

ब्लूमबर्गच्या बातमीनुसार, Apple ने सेल्फ-ड्रायव्हिंग कार लॉन्च करण्याच्या प्लॅनिंगला बराच विलंब केला आहे. कंपनीने लॉन्च 2026 पर्यंत पुढे ढकलले आहे. अहवालानुसार, कंपनीने सुमारे 8 वर्षांपूर्वी सेल्फ-ड्रायव्हिंग कारवर काम करण्यास सुरुवात केली होती.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, कारची किंमत 1 लाख डॉलर्स (सुमारे 81 लाख रुपये) असू शकते. अॅपलच्या कारमध्ये स्टिअरिंग व्हील आणि पेडल्स नसल्याची बातमी यापूर्वी आली होती. पण कंपनीची अशी कोणतीही योजना नाही. कंपनीच्या एका सूत्राने ब्लूमबर्गला सांगितले की, कंपनी कारच्या डिझाइनमध्ये काहीही वेगळे करणार नाही, कारमध्ये स्टीयरिंग व्हील आणि पेडल्स असतील.

Apple कारची किंमत आणि लॉन्च तारीख

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, कारची किंमत सुमारे 1 लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे 80 लाख रुपये असेल. पण कंपनी कारची किंमत आणखी कमी करण्याचा विचार करत आहे. जर आपण लॉन्च तारखेबद्दल बोललो तर कंपनी 2026 मध्ये कार बाजारात सादर करू शकते.

हे पण वाचा :- Driving Tips For Highway: महामार्गावर कार चालवताना ‘या’ गोष्टी लक्षातच ठेवा ! कधीही होणार नाही अपघात ; जाणून घ्या संपूर्ण माहिती