New Aadhaar Registration : लहान मुलांच्या आधारकार्डसाठी घरबसल्या करा अर्ज, परंतु घ्या ‘या’ गोष्टीची काळजी

New Aadhaar Registration : आधार कार्ड हे महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक असून आर्थिक कामांपासून ते शाळेतील अ‍ॅडमिशनपर्यंत आधार कार्ड गरजेचे झाले आहे. त्याशिवाय आता आधार कार्ड नसेल तर सरकारी योजनांचा लाभ घेता येत नाही.

आता मोठ्या व्यक्तींपासून ते लहान मुलांसाठीही आधार कार्ड बंधनकारक आहे. त्यांचे आधार कार्ड बनवणे खूप सोपे झाले असून त्यासाठी तुम्ही घरबसल्याही अर्ज करू शकता.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

पाच वर्षांखालील मुलांसाठी बाल आधार किंवा ब्लू आधार कार्ड हे निळ्या रंगाचे कार्ड आहे. विनामूल्य तुम्ही लहान मुलांसाठी काढू शकता. विशेष म्हणजे यासाठी मुलाची बायोमेट्रिक माहिती (फिंगरप्रिंट आणि बुबुळ स्कॅन) गरजेचे नसते. मूल 5 वर्षांचे झाल्यावर त्याचे बायोमेट्रिक्स (चेहऱ्याचा फोटो, बुबुळाचे ठसे आणि बोटांचे ठसे) आधार कार्डवर अपडेट करणे गरजेचे असते.

असा करा अर्ज

  • सर्वप्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर http://uidai.gov.in जा.
  • त्यानंतर आधार कार्ड नोंदणी लिंकवर क्लिक करा.
  • त्यामध्ये तुमच्या मुलाचे नाव, पालकांचा फोन नंबर, ई-मेल पत्ता इत्यादीसह सर्व क्रेडेन्शियल्स प्रविष्ट करा.
  • निवासी पत्ता, परिसर, जिल्हा, राज्य इत्यादी सर्व लोकसंख्याशास्त्रीय माहिती भरा.
  • पुढे जाऊन फिक्स्ड अपॉइंटमेंट टॅबवर क्लिक करा. आधार कार्डसाठी नोंदणीची तारीख निश्चित करा.
  • सगळ्यात शेवटी नावनोंदणी प्रक्रिया पुढे जाण्यासाठी अर्जदार जवळच्या नावनोंदणी केंद्राची निवड करू शकतो.

या गोष्टींची घ्या काळजी

आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे आणि फॉर्मच्या प्रिंटआउटसह सांगितलेल्या तारखेला संदर्भ क्रमांक केंद्रावर घेऊन जा. त्याचबरोबर कागदपत्रांसह संदर्भ क्रमांक सोबत ठेवा. एकदा संबंधित अधिकाऱ्यांनी पडताळणी केल्यानंतर आणि मुलाचे वय 5 वर्षे असेल तर, बायोमेट्रिक माहिती घेतली जाईल त्यानंतर आधार कार्डशी लिंक केली जाईल. जर मुल पाच वर्षांपेक्षा कमी असेल तर फक्त एक छायाचित्र काढले जाईल आणि बायोमेट्रिक डेटाची गरज भासणार नाही.