अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- दिवाळी सण जवळ आल्याने शहरात फटाके विक्रीचे परवाने लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने द्यावेत, अशी मागणी अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी दिले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, फटाका व्यवसाय हा फक्त दिवाळी सणापुरतीच मर्यादीत असतो. सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व फटाका व्यापा-यांवर आर्थिक संकट आलेले आहे.

दिवाळीच्या कालावधीमध्ये जर हा व्यवसाय झाला नाही तर व्यापा-यांवर फारमोठे आर्थिक संकट आढावेल. म्हणून जर फटाके विक्रेत्यांना परवाना एक महिन्या अगोदर दिल्यास शासनाच्या नियमांचे उल्लंघन न होता फटाका खरेदी ग्राहकांना सोयीस्कररित्या व गर्दी न करता येईल.

Advertisement

जर विक्री परवाने उशिरा मिळाले तर व्यापारी व ग्राहकांना अनेक संकटांना समोरे जावे लागेल. कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती लक्षात घेवुन उत्तर प्रदेश सरकारने नुकतेच फटाका विक्री परवाने ऑनलाईन पद्धतीने करत एक महिन्या अगोदर उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिलेले आहेत.

त्याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्य सरकारे देखील सद्य परिस्थितीचा गांभीर्याने विचार करुन फटाका विक्री परवाना ऑनलाईन करुन एक महिन्या अगोदर देण्याबाबत संबंधित अधिका-यांना आदेश द्यावा.

Advertisement