खोबरेल तेल डोक्याला लावण्याबरोबरच ‘येथे’ लावल्यास होतील ‘हे’आश्चर्यकारक फायदे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, केसांच्या आरोग्यासाठी नारळ तेल अर्थात खोबरेल तेल सर्वोत्तम मानले जाते. मात्र, खोबरेल तेल फक्त केसांच्या आरोग्यासाठी नाहीतर ओठांसाठी देखील खूप फायदेशीर आहे.

दररोज दोन वेळा खोबरेल तेल आपण ओठांवर लावले तर आपले ओठ कोमल आणि मऊ होण्यास मदत होते. खोबरेल तेलामध्ये मोठ्या प्रमाणात अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. हे तेल लावल्याने कोरडेपणा कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे अनेक उपयोग आहेत.

जर तुमची त्वचा तेलकट असेल तर शक्यतो तेलाचा वापर त्वचेसाठी करू नका.रात्री झोपण्यापूर्वी अनेक जण नाइट क्रिम लावतात, मात्र त्याऐवजी तुम्ही खोबरेल तेल लावलं तरी तुम्हाला बरेच फायदे होतील.

  • १) खोबरेल तेलात अँटि इन्फ्लमेटरी गुण असतात जे कोरड्या आणि निस्तेज त्वचेसाठी फायदेशीर ठरतात.
  • २) खोबरेल तेलात लॉरिक असिड असतं, ज्यामुळे कोलेजनची निर्मिती वाढते. कोलेजन त्वचेची लवचिकता आणि ग्लो राखण्यास मदत करतं.
  • ३)खोबरेल तेलामुळे त्वचेवर फाइन लाइन्सही राहत नाहीतखोबरेल तेलामुळे त्वचेवर फाइन लाइन्सही राहत नाहीत
  • ४) खोबरेल तेलामुळे त्वचेवर फाइन लाइन्सही राहत नाहीत. खोबरेल तेलात अँटि-बॅक्टेरिअल घटक असतात, जे त्वचेला कोणतंही इन्फेक्शन होऊ देत नाहीत.
  • ५) यामध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के आणि अँटि ऑक्सिडंट असतात जे त्वचेतील पेशींसाठी उपयुक्त असतात.यामध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के आणि अँटि ऑक्सिडंट असतात जे त्वचेतील पेशींसाठी उपयुक्त असतात.
  • ६)खोबरेल तेलात अँटि इन्फ्लमेटरी गुण असतात जे कोरड्या आणि निस्तेज त्वचेसाठी फायदेशीर ठरतात.
  • ७)रात्री झोपण्यापूर्वी अनेक जण नाइट क्रिम लावतात, मात्र त्याऐवजी तुम्ही खोबरेल तेल लावलं तरी तुम्हाला बरेच फायदे होतील.
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24