अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:- शिव राष्ट्र सेनेच्या शहराध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते अरुण खिची यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नवसुपे यांनी खिची यांच्या नियुक्तीची घोषणा केली.
तर शेतकरी आघाडीचे भैरवनाथ खंडागळे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी दलित आघाडी जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक अनिल शेकटकर, जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कर्पे,
कामगार सेनेचे अध्यक्ष मेजर संतोष मांडे, युवा सेना प्रमुख शंभू नवसुपे, महेंद्र सुरसे, रमेश पांचाळ आदी उपस्थित होते. अरुण खिची यांचे विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरु आहे.
शहरात असलेला त्यांचा जनसंपर्क व सामाजिक कार्याची तळमळ पाहता त्यांची संघटनेच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पदाच्या माध्यमातून ते सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी व संघटना बळकट करण्यासाठी कार्य करणार असल्याची अपेक्षा प्रदेशाध्यक्ष संतोष नवसुपे यांनी व्यक्त केली. अरुण खिची यांनी मिळालेल्या पदाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्य करणार आहे.
पुरोगामी चळवळीच्या विचारधारेने वंचितांना न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी कटिबध्द राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.