रिपब्लीकन पार्टीच्या नूतन पदाधिकार्‍यांची नियुक्ती

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :-रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (ए) आंबेडकर गटाच्या विविध पदाधिकार्‍यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

यामध्ये पाथर्डी तालुकाध्यक्षपदी सचिन मिरपगार, चर्मकार आघाडीच्या राहाता तालुकाध्यक्षपदी गणेश सोनवणे, राहुरी तालुकाध्यक्षपदी गंगाराम मोहोरे यांची निवड करण्यात आली. या नूतन पदाधिकार्‍यांना जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

या प्रसंगी जिल्हासचिव राजन ब्राह्मणे, युवक जिल्हाध्यक्ष जितू पाटोळे, जिल्हा संघटक दिनेश पलघडमल,शहराध्यक्ष हरिष आल्हाट, युवक शहराध्यक्ष संदिप वाघमारे, भिंगार शहराध्यक्ष सनी पाटोळे, वाहतुक आघाडी सचिन भिंगारदिवे, भिंगार शहर उपाध्यक्ष बंट्टी देवकर, रमेश पलघडमल, सनी जगताप, सरपंच आदिनाथ सोलट, गणेश कोरडे, साईनाथ कोरडे, युसूफ सय्यद, श्रीकांत घोडके, कानिफनाथ दारकुंडे, मनोज साळवे आदि मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे म्हणाले, रिपब्लीकन पार्टीचे नूतन पदाधिकारी हे समाजाशी नाळ जुळलेले कार्यकर्ते आहे. सामाजिक प्रश्नांना प्राधान्य देऊन सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करतील. त्याचप्रमाणे रिपब्लीकन पार्टीची ध्येय-धोरणे तळागळापर्यंत पोहचवून पक्षाचे काम वाढवावे.

त्यासाठी गाव तेथे शाखा स्थापन करण्यासाठी कार्यकत्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. याप्रसंगी नुतन पदाधिकारी सचिन मिरपगार यांनी रिपब्लीकन पक्षाने आपणावर विश्वास दाखवून जी जबाबदारी दिली आहे, ती यशस्वीपणे पार पाडू. वरिष्ठ पदाधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवून पक्ष वाढीसाठी प्रयत्नशिल राहू, असे सांगितले.

युवक जिल्हाध्यक्ष जितू पाटोळे यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करुन पक्षाच्या कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजन ब्राह्मणे यांनी केले तर शेवटी संदिप वाघमारे यांनी आभार मानले. कार्यक्रमास जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24