अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या नगर तालुका कार्याध्यक्षपदी सौरभ जपकर यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, नगर तालुका अध्यक्ष उद्धवराव दुसुंगे, विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष गजानन भांडवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली.
निलेश लंके प्रतिष्ठान चे अध्यक्ष विजूभाऊ औटी यांच्या हस्ते सौरभ जपकर यांना नियुक्ती पत्र प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला
यावेळी जिल्हा सरचिटणीस गौरव नरवडे, ऋषी खामकर, विशाल पवार, गोरख जपकर, विकास गिरी, प्रशांत पालवे, भागवत आव्हाड, विवेक सुंबे आदी उपस्थित होते.
निलेश लंके प्रतिष्ठान चे अध्यक्ष विजूभाऊ औटी म्हणाले की राष्ट्रवादी पक्षात युवकांना सन्मान सहा काम करण्याची संधी मिळत असल्याने युवावर्ग राष्ट्रवादीशी जोडला जात आहे.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादीचा नेहमीच पुढाकार राहिला असून विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लागत असल्याने पक्षात काम करताना
कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मध्ये एक प्रकारे आत्मविश्वास निर्माण झाला असल्याचे सांगून त्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.