गोदावरी कालव्याच्या नुतनीकरणासाठी 29 कोटींच्या निधीस मान्यता

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- जलसंपदा विभागाने 16 जून रोजी काढलेल्या शासन आदेशानुसार गोदावरी उजवा आणि डाव्या कालव्याच्या नुतनीकरणासाठी एकूण 29 कोटी 18 लाख रुपजलसंपदा विभागाने 16 जून रोजी काढलेल्या

शासन आदेशानुसार गोदावरी उजवा आणि डाव्या कालव्याच्या नुतनीकरणासाठी एकूण 29 कोटी 18 लाख रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली असून

यापैकी राहाता आणि निफाड तालुक्यातून जाणार्‍या उजव्या कालव्याच्या कामासाठी 13 कोटी 81 लाख रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. या निधीतून 12 कामे होणार आहेत.

दरम्यान वर्षानुवर्षे जिर्ण झालेल्या गोदावरी कालव्यांच्या कामाकरिता माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे 29 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे.

कोट्यवधींच्या या निधीमुळे कालव्यांच्या बळकटीकरणाची कामे वेगाने पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान मंजूर निधीमधून राहाता तालुक्यातील कालव्यांच्या कामाकरिता 6 कोटी 56 लाख 24 हजार रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याने

नांदुर्खी, साकुरी, अस्तगाव, गणेशनगर, वाकडी या पाच गावातून जाणार्‍या उजव्या कालव्यांची कामे तातडीने सुरू होणार असल्याचे आ. विखे पाटील यांनी सांगितले.

या उपलब्ध निधीतून कालव्यांच्या दुरुस्तीची काम सुरू होणार असल्याचे आ. विखे पाटील यांनी सांगितले. जलसंपदा विभागाच्या माध्यमातून मर्यादीत आणि ठरवून दिलेल्या

वेळेतच कालव्यांच्या दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत, असे आदेशच शासन निर्देशात देण्यात आल्याने अतिशय जागृतपणे कालव्यांची कामे जलसंपदा विभागास करावी लागणार आहेत.

दरम्यान कालव्याचे बांधकाम झाल्यास पाण्याची वहन क्षमता वाढेलच परंतु यापेक्षाही पाण्याचा होत असलेला अपव्यय थांबविण्यास मोठी मदत होईल. ओव्हरफ्लोच्या पाण्याचा लाभही लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना मिळू शकेल.

यांच्या निधीस मान्यता देण्यात आली असून यापैकी राहाता आणि निफाड तालुक्यातून जाणार्‍या उजव्या कालव्याच्या कामासाठी 13 कोटी 81 लाख रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. या निधीतून 12 कामे होणार आहेत.

दरम्यान वर्षानुवर्षे जिर्ण झालेल्या गोदावरी कालव्यांच्या कामाकरिता माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे 29 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे. कोट्यवधींच्या या निधीमुळे कालव्यांच्या बळकटीकरणाची कामे वेगाने पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.