अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त गोरे यांनी पुन्हा किराणा दुकानासह इतर आस्थापना बंद करण्याबाबत आदेश काढला आहे. उठसुठ लॉकडाऊन केलं जातंय.
हे निर्णय म्हणजे प्रशासकीय आणि राजकीय निष्क्रियपणाची साक्ष देत आहेत. देशात पहिल्या जनता कर्फ्युपासूनच हा पर्याय असू शकत नाही, असा मतप्रवाह समोर आला आहे.
आरोग्य यंत्रणेचे ‘बारा’ वाजलेत, त्याकडे लक्ष द्यायला यांना वेळ नाही. नको त्ये उद्योग करण्यात धन्यता मानत आहेत. खाजगी कोविड सेंटर मनमानी पध्दतीने आर्थिक लूट करत आहेत, त्याकडे हे पदाधिकारी सोयीस्कर ‘अर्थपूर्णरित्या’ दुर्लक्ष करत आहेत.
वारंवार आस्थापना बंद ठेवणे अव्यवहार्य आहे. वीजबिल, भाडे आणि कामगारांचे पगार या गोष्टी चुकत नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना वाटेल तसे निर्णय घेतले आहेत.
त्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, दुचाकीवर एकच व्यक्ती प्रवास करू शकतो. सध्या किमान तीसेक टक्के महिलांना दुचाकी येत नसावी. काही पुरुषांनाही येत नाही, त्यांनी का पायी प्रवास करावा काय..?
अधिकाऱ्यांच्या बिनडोकपणाबद्दल दाद कोणाकडे मागायची असाही प्रश्न आहेच की. कोरोनाने कमी आणि या नियोजनशून्य कारभाराने जास्त जीणे हैराण करून सोडले आहे.
उठसुठ बंद करण्याचे प्रकार आतातरी थांबायला हवेत. लोकांनी आता याबाबत व्यक्त व्हायला पाहिजे. नाहीतर कोरोनाच्या भीतीने आणि उपासमारीने मरण्याची वेळ आल्याखेरीज राहणार नाही.
(पत्रकार : महादेव गवळी यांच्या फेसबुकवरून साभार )