Adulteration In Petrol : सर्वसामान्य जनता दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या महागाईमुळे हैराण झाली आहे. त्यात फसवणूक वाढली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे जनतेच्या खिशावर आर्थिक ताण निर्माण झाला आहे.
अशातच बनावट पेट्रोल मोठ्या प्रमाणात विकले जात आहे. प्रत्येक वाहनाच्या चांगल्या सरासरीसाठी त्यात चांगले पेट्रोल असणे खूप गरजेचे आहे हे तुम्हाला माहीतच असेल. परंतु, बनावट पेट्रोलमुळे पाहिजे तितकी सरासरी मिळत नाही. तुम्ही आता बनावट आणि असली पेट्रोल सहज ओळखू शकता.
तुम्ही सोप्या पद्धतीने पेट्रोलची शुद्धता तपासू शकता. यात तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत नाही. पेट्रोलची शुद्धता त्याच्या घनतेवरून समजते.
जर पेट्रोलची घनता स्कोअर 730 ते 800 दरम्यान असेल तर तुमचे पेट्रोल शुद्ध आहे. तसेच जर पेट्रोलची घनता 800 पेक्षा जास्त असेल तर तुमच्या पेट्रोलमध्ये भेसळ झाली आहे.
इतकेच नाही तर तुम्ही फिल्टर पेपरची मदत घेऊनही पेट्रोलची गुणवत्ता तपासू शकता. ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला फिल्टर पेपरवर पेट्रोलचे दोन थेंब टाकावे लागणार आहे.
दोन मिनिटांनी पेट्रोल फिल्टर पेपरमधून उडते. तर दुसरीकडे, पेट्रोल सुकल्यानंतर फिल्टर पेपरवर गडद रंगाचा डाग राहतो. त्यावेळी तुमच्या पेट्रोलमध्ये भेसळ झाली आहे असे समजावे.