Facebook Alert : सध्याच्या काळात फेसबुकचा वापर खूप वाढला आहे. त्यातच फेसबुक आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक फीचर्स उपलब्ध करून देत असते. त्यामुळे फेसबुक पूर्वीपेक्षा खूपच रंजक झाले आहे.
तसेच गुन्ह्यांमध्येही वाढ झाली आहे. काहीजण फेसबुकवर हेरगिरी करत असतात. जर तुमच्यावर कोण नजर ठेवत असेल तर ते तुम्ही आता सोप्या पद्धतीने जाणून घेऊ शकता.
फॉलो करा या स्टेप्स
स्टेप 1
- फेसबुकवर तुमच्यावर नजर कोण करत आहे हे जाणून घ्यायचे असेल, तर तुम्हाला आधी फेसबुकच्या वेब व्हर्जनवर जावे लागेल.
- त्यानंतर तुमचा आयडी आणि पासवर्डसह लॉग इन करावे लागणार आहे.
स्टेप 2
- वेबवर तुम्हाला उजव्या ठिकाणी क्लिक करावे लागेल.
- जिथे तुम्हाला पेज सोर्ससह पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा.
स्टेप 3
- यानंतर तुम्हाला Control + F चे बटण दाबावे लागणार आहे.
- त्यानंतर सर्च बारवर जा आणि येथे जाऊन मोठ्या आयडीवर क्लिक करा.
- आता येथे उपस्थित असलेला कोणताही आयडी कॉपी करून तो नवीन टॅबमध्ये उघडा.
स्टेप 4
- त्यानंतर तुम्हाला URL स्पेसमध्ये Facebook.com/15-अंकी आयडी लिहून टाकावा लागेल.
- यानंतर, तुमचा स्टॉक करणाऱ्या व्यक्तीचे प्रोफाइल तुमच्या समोर येईल.