Phone Call Recording : तुमचाही कॉल रिकॉर्ड होत नाही ना? अशाप्रकारे करा चेक

Phone Call Recording : फोन कॉल रेकॉर्ड करणे हे कायदेशीर नसून बेकायदेशीर आहे. अनेकजण अनेकदा एखाद्या महत्वाच्या किंवा खाजगी विषयांवर फोनवर बोलत असताना आपला कॉल कोणी रेकॉर्ड तर करत नाही अशी भीती अनेकांच्या मनात असते.

परंतु, आता आपला कॉल कोण रेकॉर्ड करत आहे की नाही ते सहज समजू शकते. त्यासाठी काही ट्रिक्स लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे.या ट्रिक्स काय आहेत त्या जाणून घेऊयात.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अशाप्रकारे घ्या जाणून

समोरची व्यक्ती तुम्हाला कॉलवर रेकॉर्ड करत आहे की नाही हे जाणून घ्यायचे असेल तर फार कष्ट घ्यावे लागत नाहीत. त्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. शक्यतो जर तुमचा कॉल रेकॉर्ड होत असेल तर अगोदर घोषणा होते. परंतु जर समोरच्या व्यक्तीचा फोन खूप जुना असेल तर अशी कोणतीच कल्पना मिळत नाही.

दुसऱ्या आवाजाकडे लक्ष द्या

जर तुम्ही एखाद्याशी बोलत असताना, जर तुम्हाला फक्त बीपऐवजी लांब बीप ऐकू येत असेल किंवा दुसर्‍या टोनचा आवाज येत असेल तर समजून घ्यावे की तुमचा कॉल रेकॉर्ड होत आहे.

बीप साउंडमुळे समजते

जर तुम्ही फोनवर बोलत असताना बीप असा साउंड ऐकू आला तर याचा अर्थ असा की तुमचा कॉल रेकॉर्ड होत आहे. त्याचबरोबर कॉल घेतल्यानंतर बीप ऐकू येत असेल तरीही समजावे की तुमचा कॉल रेकॉर्ड होत आहे.

हा आहे कॉल टॅपिंग आणि कॉल रेकॉर्डिंगमध्ये फरक

अनेकांना असे वाटते की कॉल टॅपिंग आणि कॉल रेकॉर्डिंग ही एकच गोष्ट आहे परंतु, तसे नाही. कारण कॉल टॅप करत असताना तिसरी व्यक्ती दोन लोकांचे बोलणे रेकॉर्ड करत असते. समोरच्या कॉलरद्वारे केलेले रेकॉर्डिंग कॉल रेकॉर्डिंगच्या आत येते,हे लक्षात घ्या.