वाढदिवसाचा गोंधळ कमी करण्याचे सांगितल्याने दोन गटांत सशस्त्र हाणामारी !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- वाढदिवसानिमित्त सुरू असलेला गोंधळ कमी करण्याचे सांगितल्याच्या कारणातून दोन गटांत सशस्त्र हाणामारी झाली.

ही घटना संगमनेर शहरातील नाटकी नाला परिसरातील इस्लामपुरा येथे घडली. या हल्ल्यात ७ जण गंभीर जखमी झाले असून याप्रकरणी तब्बल २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

]याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील इस्लामपुरा येथील हूजेज बागवान यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम रात्री सुरू होता. यावेळी मोठा गोंधळ चालू असताना अमजद दाऊद सय्यद व त्याचा भाऊ संबंधितांना समजावून सांगण्यासाठी गेले.

याचा राग आल्याने काही युवकांनी लाठ्या-काठ्या हॉकी स्टिक याच्या साहाय्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. याची माहिती समजताच दुसऱ्या गटाचे युवकही जमा झाले. दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली.

या हाणामारीत धारदार शास्त्रांचा वापर करण्यात आला. यात सात जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी पोहोचले.

त्यांनी जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले. याबाबत परस्परविरोधी फिर्याद देण्यात आल्या असून पोलिसांनी यातील पाचजण ताब्यात घेतले असून इतर पसार झाले आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24