अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- जवानाच्या घरावर दरोडा टाकून १० तोळे सोने, दोन मोबाईलसह अन्य ऐवज दरोडेखोरांनी लंपास केल्याची घटना लातूर तालुक्यातील चाकूर तालुक्यात मंगळवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर असे कि, चाकूर तालुक्यातील महाळंगी येथील सौदागर राजाराम चरक हे सध्या लातूररोड येथे घर बांधून राहतात. चरक सैन्य दलामध्ये जवान म्हणून आसाम राज्यात सेवा बजावत आहेत.
५ जूनला एक महिन्याच्या रजेवर ते गावी आले आहेत. दरम्यान, ४ जूलैला परत आसामला जाणार आहेत. मंगळवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घरासमोर चोर आल्याची चाहूल चरक कुटूंबियांना लागली.
खिडकीतून बाहेर पाहिले असता हतात बॅटरी घेऊन असलेले लोक दिसून आले. त्यावर चरक यांच्या कंम्पांउड मधून दरोडेखोरांनी प्रवेश केला. घराच्या मुख्य दरवाजाला धक्के देऊन दरवाजा तोडून आत प्रवेश केला.
चरक कुटूंबियांना दोघांनी चाकूचा धाक दाखवून धमकाविले. तर अन्य दोघांनी घरातील एका कपाटातील सोन्याचे दागिने त्यात मिनी गंठण, लॉकेट, झुमके, सरपाळे असे दहा तोळ्याचे होते. दरोडेखोरांनी ते दागिने लंपास केले.
जाताना चरक आणि त्यांच्या पत्नीचे मोबाईल दरोडेखोरांनी घेऊन गेले. दरम्यान पोलिसांनी दरोडेखोरांना पकडण्यासाठी पथके तैनात केली असून नाकाबंदी केली आहे तसेच घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले आहे.
अहमदपूर नजिक पोलिसांनी कार मधील दरोडेखोरांचा पाठलाग केला. तेव्हा दरोडेखोरांनी कार सोडून अंधाराचा फायदा घेत पळून गेले.
चोरांनी वापरलेली कार (एम.एच.४४ बी १३४) ही कार २७ जून रोजी अंबाजोगाई येथून चोरीस गेली होती.असे पोलीस निरीक्षक सिरसाट यांनी सांगितले. तिच कार आता पोलिसांच्या हाती लागली आहे. पोलिस दरोडेखोरांच्या शोधात आहेत.