अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-गावठी कट्टा लावून शहरात फिरत असलेल्या संदीप महादेव रायकर (वय 29 रा. हंगेवाडी ता. श्रीगोंदा) या तरूणाला तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान पोलिसांनी ‘या’ तरुणांकडून 20 हजार रूपये किंमतीचा गावठी कट्टा पोलिसांनी जप्त केला आहे. मंगळवारी रात्री शहरातील रेसीडेन्शीअल शाळेच्या बाहेर पोलिसांनी ही कारवाई केली. याबाबत अधिक माहिती अशी कि,
रायकर कंबरेला गावठी कट्टा लावून फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांना मिळाली होती. पोलीस पथकाने मंगळवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास रायकर याला गावठी कट्ट्यासह अटक केली.
पोलीस शिपाई दत्तात्रय कोतकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रायकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके करीत आहे.