अहमदनगर Live24 टीम, 10 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष हनिफ शेख व समिती सदस्यांवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना तातडीने अटक करून दोषींविरूद्ध कारवाई करावी,

अशी मागणी महाराष्ट्र राज्य कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीने केली आहे. समितीचे श्रीरामपूर तालुका समन्वयक मिलिंदकुमार साळवे, बाळासाहेब जपे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांना याबाबत निवेदन देण्यात आले.

महसूल नायब तहसीलदार ज्योती गुंजाळ यांनी हे निवेदन स्वीकारले. यावेळी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष निलेश शेडगे, निवृत्त मुख्याध्यापिका हेमलता कुदळ, समितीचे पदाधिकारी फिलिप पंडित,

रंजन लोखंडे, शालिनी ससाणे, माया जाधव, अरूणा शेळके, अभिषेक पवार आदी उपस्थित होते.६ सप्टेंबर रोजी बारडगाव ( ता. कर्जत) येथील आदिवासी युग प्रवर्तक सामाजिक विकास प्रतिष्ठान संचलित यशोधरा मुला-मुलींच्या बालगृहाचे अध्यक्ष ईश्वर काळे,

त्यांची पत्नी, सून आणि इतर १० ते १५ महिला पुरुष यांनी पूर्व सूचना न देता नगर येथील बाल कल्याण समिती कार्यालयात घुसून धुडगूस घातला. समितीचे कामकाज सुरू असतांना अनधिकृतपणे येऊन समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांवर शाई फेकली.

अध्यक्ष हनिफ शेख यांच्या चेहऱ्याला शाई फासून त्यांना मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली, समितीसमोर बाल संरक्षण कक्षाचे २ अधिकारी हजर होते.