ताज्या बातम्या

New Year 2023 : अर्रर्र! कायमची बंद होणार ‘ही’ उत्पादने, यादीत आयफोनचाही समावेश

Published by
Ahmednagarlive24 Office

New Year 2023 : अनेकजण नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहत आहेत. उद्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होत आहे. मार्केटमध्ये सतत नवनवीन उत्पादने लॉंच होत असतात.

अशातच आता काही उत्पादने नवीन वर्षात कायमची बंद होणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या यादीत ॲपलच्या आयफोन मिनीचाही समावेश आहे.

1. बंद होणार iPod Touch 

ॲपलने या वर्षी मे महिन्यातच आपला iPod Touch बंद केला होता. ॲपलचा हा जगातील पहिला MP3 प्लेयर होता जो 10 तासांच्या बॅटरी लाइफसह 1,000 गाण्यांचा एक सेट लोकांमसमोर आणला. तो 2001 मध्ये लाँच झाला होता. सध्या लोकांना YouTube Premium आणि इतर स्ट्रीमिंग ॲप्स आवडू लागली आहेत.

2. आयफोन मिनी

याच वर्षी ॲपलनेही आयफोनचे मिनी व्हर्जन बंद केले. वापरकर्त्यांना फ्लॅगशिप फोनची परवडणारी आवृत्ती मिळावी, म्हणूनच कंपनीने मिनी आवृत्ती सादर केली. त्याची किंमत निश्चितच कमी होती, परंतु 40,000 रुपयांच्या श्रेणीत जास्त सुविधा नव्हत्या. या हँडसेटमध्ये 5.4-इंचाचा डिस्प्ले होता, जो खूपच कॉम्पॅक्टआणि डिझाइनही खूप जुने होते. त्यामुळे मिनी व्हर्जनची विक्रीही कमी झाली.

3. मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर 

सध्या इंटरनेट एक्सप्लोररही बंद असून तो सुमारे दोन दशकांहून अधिक काळ काम करत होता. त्याऐवजी आता नवीन एज ब्राउझरच्या परिचयासह वापरकर्त्यांना एक चांगला, सुरक्षित आणि वेगवान इंटरनेट ब्राउझर वापरकर्त्यांना देत आहे. इंटरनेट एक्सप्लोरर एकूण 25 वर्षांपूर्वी लॉन्च केले होते.

4. ब्लॅकबेरी 

ब्लॅकबेरीचे नाव सर्वोत्कृष्ट स्मार्टफोनमध्ये घेतले जायचे. परंतु, यावर्षी तो बंद करण्यात आला. यामागचे मुख्य कारण म्हणजे फीचर्सच्या युगात फोन तंत्रज्ञानानुसार स्वतःमध्ये बदल करू नाही.

गतवर्षी डिसेंबरमध्ये, कंपनीने जाहीर असे केले होते की, BlackBerry 7.1 OS, BlackBerry 10 सॉफ्टवेअर, BlackBerry PlayBook OS 2.1 आणि जुन्या आवृत्त्या 4 जानेवारी 2022 नंतर उपलब्ध नसतील.

5. Stadia स्ट्रीमिंग सेवा 

लवकरच गुगलने Stadia बंद केली जाणार आहे. कंपनीचे म्हणणे आहे की त्यांच्या उत्पादनाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे गुगलने स्टॅडिया स्ट्रीमिंग सेवा बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ते पुढच्या वर्षी 18 जानेवारीपर्यंत उपलब्ध असेल.

Ahmednagarlive24 Office