अर्रर्र! टोमॅटो 200 रुपये तर मिरची 700 रुपये किलो; आयात बंदीमुळे दर गगनाला भिडले

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- भारताशेजारील श्रीलंका देशामध्ये परकीय चलनसाठा सुमारे 1.6 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली घसरल्याने सरकारने अनेक जीवनावश्यक वस्तूंवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांनी काय खावं? हा प्रश्न पडला आहे.

श्रीलंकेमध्ये मागच्या एका महिन्यात खाण्यापिण्याच्या वस्तूमध्ये 15 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. 100 ग्रॅम मिरची खरेदीसाठी 71 रुपये मोजावे लागत आहेत. म्हणजेच एक किलो मिरची 700रुपये इतकी महाग मिळते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

त्याचसोबत वांगी 160रु किलो, टोमॅटो 200रु किलो, तर भेंडी 200रु किलो, कोबी 240रु किलो अशी महागाई वाढली आहे. याचसोबत आयात बंदीमुळे एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीही 85 टक्के वाढल्या आहेत.

दुधाच्या दरामध्येही प्रचंड वाढ झाली आहे. सरकारने घातलेल्या निर्बंधामुळे हा देश आर्थिक संकटात सापडला आहे. सुमारे 2.2 कोटी लोकसंख्या असणारा हा देश आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या संकटातून जात आहे.

कोरोना संसर्गामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर 90 टक्के परिणाम झाला आहे. यामुळे देशातील चलन चांगलेच कोलमडले आहे. याचा परिणाम म्हणून महागाई वाढवले व सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावली आहे.