अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2022 Ahmednagar News:-राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आज नगरला आल्या होत्या. त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी संबंधी बहुतांश प्रश्नांना उत्तरे देणे सुळे यांनी टाळले. त्या म्हणाल्या, ‘माझे लक्ष सध्या भोंग्यांकडे नाही, तर महागाई आणि इतर प्रश्नांकडे आहे.
त्यामुळे या विषयावर कोणी काय बोलले हे मी पहात नाही. या विषयाची प्रसार माध्यामांमधून जास्त चर्चा होताना दिसते, कोणीच हा विषय वाढवू नये.
अर्थात लोकशाहीत कोणा काय बोलावे हे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आणि प्रसारमाध्यमांनी काय बातम्या द्याव्यात, हा त्यांचा हक्क आहे. पण माझी विनंती आहे की प्रसारमाध्यमांनी प्रश्नांचे प्राधन्यक्रम ठरविले पाहिजेत,’ असेही त्या म्हणाल्या.
यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कार्याध्यक्ष संदीप वर्पे, आमदार संग्राम जगताप, आमदार निलेश लंके, आमदार डॉ. किरण लहामटे उपस्थित होते.
राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे इतर पक्षांच्या नेत्यांनी आपली भूमिका बदलून देवदर्शन करणे आणि त्याचे फोटो शेअर करणे सुरू केले का? या प्रश्नावर त्या म्हणाल्या, ‘आम्ही अजिबात बदललो नाही.
पूवीपासूनच आम्ही मंदिरात जातो. माझे सोशल मीडिया आकाऊंट पहा. तेथे असे फोटो दिसून येतील. त्यामुळे कोणी बोलले म्हणून भूमिका बदलली असेही म्हणता येणार नाही,’ असेही सुळे म्हणाल्या.