अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2021 :- जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेची निवडणूक जवळ येऊ लागलीआहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी आता कर्मचारी देखील तयारीला लागले आहे. यामुळे मुख्यालयातील तब्बल २६ जण १५ दिवसांच्या रजेवर गेले आहेत.
दरम्यान जिल्हा परिषद पतसंस्थेच्या २१ जागांसाठी १९ डिसेंबरला मतदान होणार आहे. संजय कडूस यांच्या नेतृत्वाखाली श्री गणेश पॅनल व सुभाष कराळे यांच्या नेतृत्वाखालील श्रीपावन गणेश मंगलमूर्ती पॅनल यांच्यात दुरंगी लढत होत आहे.
दोन्ही मंडळांनी या निवडणुकीत विजय मिळविण्याचा निर्धार केलेला आहे. त्या दृष्टीनेच प्रचाराचे नियोजन करण्यात आले आहे. काही ठिकाणी अपक्ष उमेदवार असल्याने काही ठिकाणी तिरंगी दिसत असली तरी दुरंगी लढत होणार आहे.
दरम्यान निवडणुकीच्या या प्रचारात अडचण यायला नको म्हणूनच अनेकांनी उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवसापासून रजा टाकली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील तब्बल २६ जण रजेवर गेले असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाने दिली.