महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे एका दिवसात तब्बल इतके नवे रुग्ण.

Published by
Ahmednagarlive24 Office

 

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :-मुंबई : राज्यात ओमिक्रॉनचा प्रभाव वाढत असून मुंबईत एकाच दिवसात तब्बल 87 रुग्ण आढळले आहेत. 43 प्रवाशांना आंतरराष्ट्रीय प्रवास तर त्यांच्या सहवासातून 4 जणांना बाधा झाली आहे. 37 जणांचा कोणताही आंतरराष्ट्रीय प्रवास नसून त्यांनाही लागण झाली आहे. सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आहे.

मुंबई ओमिक्रॉनचे 34 रुग्ण आढळून आलेत. तर महाराष्ट्रात एकूण तब्बल 3 हजार 900 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान, जवळपास चार हजाराच्या जवळपास हा आकडा पोहोचल्यानं सगळेच धास्तावले आहेत.

कोरोना विषाणी पुन्हा गुणाकार करु लागल्यानं आता वेळीच धोका ओळखून अधिक सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त केली जाते आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासाबाबत कडक निर्बंध पाळले पाहिजेत असा जनसामान्यातून आवाज येऊ लागला आहे.

काय आहे आजची आकडेवारी?
महाराष्ट्रातील आजचे नवे रुग्ण – 3900
आज किती मृत्यू – 20
रुग्ण बरे होण्याचं प्रमाण – 97.61%
किती रुग्ण आज बरे झाले – 1306
होम क्वारंटाईनमध्ये किती – 122906
ओमिक्रॉनचे किती नवे रुग्ण – 85
ओमिक्रॉनचे कुठे किती रुग्ण?
मुंबई – 3
नागपूर आणि पिंपरी चिंचवड- प्रत्येकी 3
नवी मुंबई आणि पुणे मनपा – प्रत्येकी 2
पनवेल, कोल्हापूर आणि बुलढाणा – प्रत्येकी
एकट्या मुंबईत सर्वाधिक रुग्णवाढीची नोंद
दरम्यान, मुंबई आंतरराष्ट्रीय प्रवासाचं ठिकाण असल्या कारणाने मुंबईत कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे, एकाच दिवसात तब्बल 2 हजार 510 नवे कोरोना रुग्ण एकट्या मुंबईत आढळून आल्याने प्रशासन आणि मुंबईकर सतर्क झाले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उत्तम नियोजन आणि कोरोनाला रोखणारा मुंबई पॅटर्न जगभर गाजला मात्रा आता सुद्धा तसाच पद्धतीने नियोजन करण्याची वेळ येत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office