बँक कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे वाचले तब्बल ५० लाख रुपये

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :- कर्जत येथील बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधनामुळे तब्बल ५० लाख रुपये वाचल्याची घटना घडली आहे.

सुरज सुखदेव सोळसे(वय २८ वर्ष, पद विशेष सहाय्यक, युनियन बँक ऑफ इंडीया, बारडगाव, ता.कर्जत, जि अहमदनगर) यांनी सकाळी १०.३०वाजता कर्जत शाखा येथुन ५० लाख रुपयांची रक्कम विड्रोल केली.

सदर रक्कम गाडीत ठेऊन गाडी चालू केली असता एक अनोळखी लहान मुलाने ऑइल गळत असल्याचे सांगीतले. दरम्यान गाडीतून ऑइल येऊ शकत नसल्याबाबत विश्वास होता.

याचवेळी गाडीतील रकमेची बॅग फेकण्याचा डाव असताना गाडीतुन परंतु सुरज सोळसे यांनी सतर्कपणा दाखवत सदरची कॅश पुन्हा बँकेत जमा केली आहे. सुरज सोळसे यांचे सतर्कतेमुळे ५० लाख रुपयाची लुट थांबली आहे.

त्याबद्दल कर्जत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी त्यांचा सत्कार केला. ऑइल गळत आहे, गाडीचे टायर पंक्चर झालंय आदी कारणे सांगुन रोख रक्क्म चोरट्याकडून लुटण्याचे प्रकार होत असून जनतेने सतर्कता बाळगावी असे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24