अनलॉक होताच नागरिक बेभान… अखेर प्रशासन उतरले रस्त्यावर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- अनलॉक नंतर पाथर्डी शहरातील बाजार पेठेतील दुकानासह रस्तावर विनाकारण फिरून गर्दी करणाऱ्या लोकांवर तालुका प्रशासनने कारवाई करायला सुरुवात केली आहे.

प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्य बाजार पेठेत दुकानात विना मास्क असणारे , विनाकारण गर्दी, दुचाकीवरून हिरोगिरी करत फिरणाऱ्यांवर कारवाई केली आहे. नुकतीच अनलॉकची घोषणा करण्यात आली आहे.

पाथर्डी शहरातील वसंतराव नाईक चौक, अजंठा चौक, क्रांतीचौक, नवीपेठ , शेवगाव रोड आणि जुन्या बस्थानाक परिसरात प्रशासनाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पायी फिरून दुकानदारांना गर्दी होणार नाही,

दुकानात असलेल्या ग्राहकांनी व मालकाने मास्कचा वापर करून सामाजिक अंतर ठेऊन सँनिटयझरचा वापर करण्याच्या सक्तीच्या सूचना केल्या आहेत. सोमवार पासून जिल्हयाचे निर्बंध संपुर्णपणे हटवण्याचा प्रयत्न करुन जनजिवन सुरळीत केले आहे.

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी संपुर्ण अनलॉक केला आहे.तेव्हा पासून कोरोना संसर्गाचे भान सर्वच मंडळी विसरून सर्रासपणे रस्त्यांवर आली आहे. परिणामी मोठ्या प्रमाणावर सर्वच जागी गर्दी होत आहे.

पंधरा ते वीस लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. सोमनाथ गर्जे,अंबादास साठे,रवींद्र बर्डे ,राजेंद्र बालवे,पांडुरंग सोनटक्के,नंदलाल गोला,सरदार शेख,पंकज पगारे आदी पालिका कर्मचारी मोहिमेत सहभागी होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24