अधिकाऱ्यांची एंट्री होताच वाळू तस्करांनी नदीपात्रातून धूम ठोकली

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-श्रीरामपूर तालुक्यात वाळू तस्करी सुरु असलेल्या घटनास्थळावर अचानक प्रांताधिकारी, पोलीस उपअधीक्षक व तहसीलदार यांनी धाड टाकल्याने वाळू तस्कर चांगलेच गोंधळले होते.

भांबरलेल्या या तस्करांनी वाळू भरणारे ट्रॅक्टर घटनास्थळीच सोडून तेथून पळ काढला. याबाबत सविस्तर माहिती अशी कि,

श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण व नायगाव परिसरातील गोदावरी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सर्रासपणे सुरू असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार प्रांताधिकारी अनिल पवार, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, तहसीलदार प्रशांत पाटील, महसूल अधिकारी, मंडलाधिकारी, तलाठी व पोलीस पथक यांनी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास अचानक मातुलठाण गोदावरी नदीपात्रात गेले.

महसूलचे पथक आल्याची कुणकुण लागताच पात्रातून डंपर, ट्रॅक्टरमध्ये वाळू भरणारे त्यांचे सहकारी सर्वजण पसार झाले. या ठिकाणी जवळपास 10 ब्रास वाळू मिळून आली. या वाळूचा लवकरच लिलाव करण्यात येणार असल्याचेही तहसीलदारांनी सांगितले.

अनेक दिवसापासून या ठिकाणी सर्रास वाळूचा उपसा झाल्याने या ठिकाणी खड्डेच खड्डे पडले आहेत. नदीतील बाजूचा मोठया प्रमाणावर उपसा झाल्याने नदीमध्ये पाणीसाठा जादा टिकत नाही.

त्यामुळे नदीकाठच्या गावातील विहीरीही उन्हाळयात कोरड्या पडतात. दरम्यान महसूल अधिकाऱ्यांसह पोलीस पथकांनी अचानक धाड टाकून केलेल्या या कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे.

ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb

अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24