दानपेटीचे लॉक न तुटल्याने चोरट्यांनी कटरने दानपेटी फोडली

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे . यातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील श्री क्षेत्र रेणुकामाता मंदीराचा दरवाजा तोडून धाडसी चोरी झाल्याची घटना घडली आहे.

चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी बाहेर काढून लॉक न तुटल्याने खालच्या बाजुला दान पेटी कट करून नोटा चोरून पोबारा केला.

पोलीसांना कळविण्यात आले असून पोलीस पाटील घटनास्थळी दाखल आहे.

या चोरटयांनी सुमारे २ लाखाची रक्कम लंपास केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Ahmednagarlive24 Office