पावसाचा जोर ओसरताच धरणाच्या पाणी पातळीतील वाढ थांबली

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :-  जून महिना कोरडा कोरडा गेल्यानंतर अखेर वरुणराजाने जुलै महिन्यात आपली हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. पावसाच्या आगमनाने जिल्ह्यातील नागरिकांबरोबरच शेतकऱ्यांमध्ये कमालीची उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यातच नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर आणि कर्जतलावरदान ठरलेल्या कुकडी प्रकल्पातील धरणांच्या पाणलोटात पावसाचा जोर कमी झाला असलातरी अजूनही पाण्याची आवक सुरू आहेकुकडी या प्रकल्पात तब्बल 2466.49 दलघफू विक्रमी पाणी नव्याने दाखल झाल्याने एकूण उपयुक्त पाणीसाठा 10722 दलघफू (36.13 टक्के) झाला आहे.

गतवर्षी या प्रकल्पात 6283 दलघफू (21.17 टक्के) पाणी होते. यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत 15 टक्क्यांपेक्षा अधिक पाणी आहे. या प्रकल्पातील सर्वाधिक साठवण क्षमता डिंभे धरणाची 13.50 टीएमसी आहे.

गत 24 तासांत या धरणात सर्वाधिक 989 दलघफू नवीन पाण्याची आवक झाल्याने काल सकाळी 6463 दलघफू (51.64 टक्के) पाणीसाठा झाला होता.

पाण्याची आवक सुरूच असल्याने हे धरण उशीरा निम्मे भरले. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

काही धरणातील पाणीसाठा –

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24