अहमदनगर जिल्ह्यातील हे दोन नेते एकत्र आल्याने आल्याने चर्चेला उधाण !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून श्रीरामपुरात माजी आमदार भानुदास मुरकुटे व उपनगराध्यक्ष करण ससाणे यांची सहमती होऊन दोघांचीही बिनविरोध निवड झाली.

त्यानंतर ससाणे समर्थकांनी दोघांच्याही अभिनंदनाचे फलक शहरात लावले. ही सहमती अशीच पुढे राहील अशी चर्चा सुरू असतानाच रविवारी श्रीरामपुरात आमदार राधाकृष्ण विखे व मुरकुटे एकाच व्यासपीठावर आल्याने

शहरात पुन्हा एकदा राजकीय संभ्रम तयार झाला आहे. दोन वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून आमदार राधाकृष्ण विखे आणि माजी आमदार भानुदास मुरकुटे यांची राजकीय युती झाली होती.

त्याचे पडसाद पंचायत समितीच्या सभापती निवडीच्या वेळीही बघायला मिळाले. त्यानंतर सर्व निवडणूका युती करून लढवायच्या असे जाहीरही झाले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24