अहमदनगर Live24 टीम, 14 जुलै 2021 :- पंढरपूरला पायी जात असतात. पायी वारीची ही अनादी काळापासून चालत आलेली परंपरा आहे.
आता या पायी वारीत लहान मुलांपासून ते वृद्ध देखील उत्साहाने सहभागी होतात. अलीकडे या वारीत तरुण देखील सहभागी होत आहेत. सध्या मात्र कोरोना च्या प्रादुर्भावामुळे या वारीवर देखिल बंधने आली आहेत.
तरी नगर जिल्ह्यातील शेवगाव येथील १३ सायकल प्रेमी तरुणांनी शेवगाव ते पंढरपूर असा २३० किलोमिटर अंतराचा प्रवास सायकलवर करत अनोखी पंढरपूर वारी पुर्ण केली.
शेवगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवाजी महाराजांची पुजा करून सायकलस्वारांनी शनिवारी पहाटे पाच वाजता पंढरपूरकडे प्रस्थान केले.
पाथर्डी मार्गेकडा, मिरजगाव, करमाळा असे सुमारे १८५ किलोमीटर अंतर पार करून सायकलस्वारांनी सायंकाळी ७ वाजता टेंभुर्णी येथे पहिला मुक्काम केला.
त्यानंतर रविवारी ( दि. ११ ) पहाटे पाच वाजता टेंभुर्णीहून निघून ४५ किलोमीटरचे अंतर सायकल प्रवास करीत पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. या वारीत अनेक डॉक्टर देखील सहभागी झाले होते.