अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :-राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील पूर्वीपासून असणारा वहिवाटीचा सामायिक रस्ता पटारे नामक लोकांनी बंद करून सुमारे दोनशे लोकांना वेठीस धरले आहे.
याबाबत काही महिला व पुरूषांनी राहुरी येथील तहसिलदार यांना निवेदन देऊन सदर रस्ता त्वरित सुरू करावा. अशी मागणी केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, सुमारे दिडशे ते दोनशे लोक हे वांबोरी येथील सत्रे- कुऱ्हे वस्तीवर राहत आहेत.
त्यांच्या शेतामध्ये व वस्त्यांवर जा- ये करण्यासाठी पूर्वीपासून जूना सोनई रस्ता आहे. त्या रस्त्याच्या कडेला राहणारे चंद्रकांत लक्ष्मण पटारे, बाळासाहेब चंद्रकांत पटारे, बाबासाहेब चंद्रकांत पटारे या लोकांनी त्या सामाईक रस्त्यावर काट्या टाकून रस्ता बंद केला आहे.
सत्रे- कुऱ्हे वस्तीवर राहणाऱ्या लोकांमध्ये काही अपंग, काही शाळकरी मुले तर काही वयोवृद्ध लोक राहत आहेत. रस्ता बंद असल्यामुळे सर्वांनाच मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे.
सदर रस्त्या बाबत कायदेशीर कारवाई सुरू असताना दिनांक १८ जुलै रोजी सदर पटारे नामक लोकांनी वस्तीवरील पुनम बाबासाहेब सत्रे व अभिजीत बाबासाहेब सत्रे यांना दगडाने मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
सदर व्यक्ती हे नंगट प्रवृत्तीचे असून ते कायद्याला जुमानीत नाही. त्यांच्यावर विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. ते वस्तीवरील लोकांना धमकी देऊन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत आहेत. तसेच सौ. अलका चंद्रकांत पटारे ह्या शिवीगाळ करून खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत आहेत.
सदर व्यक्तींमुळे वस्तीवरील कोणाची जिवीत हानी झाल्यास त्यास चंद्रकांत पटारे, बाळासाहेब पटारे, बाबासाहेब पटारे तसेच सौ. अलका पटारे हे जबाबदार राहतील. तरी सदर लोकांवर कायदेशीर कारवाई करावी.
असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर शोभा सत्रे, पूनम सत्रे अलका सत्रे, कमल कुऱ्हे, संगिता कुऱ्हे, सुशिला कुऱ्हे, अभिजित सत्रे, जालिंदर सत्रे, बाबासाहेब सत्रे, विनायक सत्रे, पोपट सत्रे, गंगाधर सत्रे, अजित सत्रे, शशिकांत कुऱ्हे, सुर्यभान कुऱ्हे, भरत कुऱ्हे, संदीप कुऱ्हे, विकास कुऱ्हे, शुभम कुऱ्हे, ज्ञानेश्वर कुऱ्हे आदिंच्या सह्या आहेत.