पत्ता विचारला अन मंगळसूत्र तोडून पळाला!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:-पत्ता विचारण्याचा बहाणा करत एका अनोळखी इसमाने महिलेच्या गळ्यातील पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र तोडून पळून गेला.

ही घटना सावेडी परिसरातील शिलाविहार रोडवर घडली आहे. याबाबत भाग्यश्री अरुण भणगे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, भाग्यश्री भणगे या शिलाविहार रोडवरील अमेय अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये त्यांच्या नातीला खेळवत होत्या.

यावेळी दोन अनोळखी इसम आले, त्यातील एकजण भणगे यांच्या जवळ गेला व त्यांच्या हातात एक कागदाची चिट्टी देत,म्हणाला हा पत्ता कोठे आहे ते सांगा.

भणगे या तो कागद घेण्याचा प्रयत्न करत असतानाच त्या भामट्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून धूम ठोकली. याप्रकरणी भणगे यांच्या फिर्यादीवरून

तोफखाना पोलिसांनी अज्ञात दोन चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सुरसे हे करत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24